Indus News TV Live

Thursday, March 12, 2026
spot_img

सर अलेझानंडर कंनीगंहम – Father of Archaeology

लेखक- शामराव सोमकुवर, महाराष्ट्र

सर अलेझानंडर कंनीगंहम यांचा जन्म 23 जानेवारी,1814 मध्ये लंडन येथे स्कॉटीश फॅमिली मध्ये झाला. वडिलांचे नाव ऑलन आणि आईचे नाव जीन नी. त्याला ईस्ट इंडिया कंपनी कडून  रॉयल इंजिनिअर ऑफ इस्टेट करिता स्कॉलरशिप मिळाली व टेक्निकल प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्याची नियुक्ती बेंगाल इंजिनिअर मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून  भरती करण्यात आली, त्यावेळी त्याचे वय केवळ 19 वर्षे होते.9 जून 1833 ला तो भारतात आला. (Alexander Cunningham Father of Archeology)
1837 मध्ये जेम्स प्रिन्सेप ने सम्राट अशोकाचे शिलालेख शोधून काढले व त्याचें वाचन केले व धम्मलिपीचा शोध लावला ही बातमी संपूर्ण जगभर पसरली म्हणून अनेक लोक जेम्स प्रिन्सेप ला भेटायला येत असे. अशीच उत्सुकता सर अलेझानडर कंनीगंहम ला सुद्धा वाटली, जेंव्हा तो जेम्स प्रिन्सेस ला भेटला तेंव्हा त्यांचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले व त्याना असे वाटू लागले की आपण फार पूर्वी पासून मित्र घनिष्ठ मित्र आहोत, कारण या दोघांनी जे बुद्धीझम वर काम केले ते या पूर्वी कोणीही केले नाही.
1836 ते 1840 या कालावधी मध्ये त्याची नियुक्ती लॉर्ड औकलंड, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया चे पर्सनल सेक्रेटरी म्हणून करण्यात आली.1841 मध्ये त्याची नियुक्ती औंध( Awadh) चे राजे नवाब सादत खान चे चिफ एक्सयूकुटीव इंजिनिअर म्हणून करण्यात आली,1842 मध्ये बुंदेलखंड मध्ये काम केले तर नौगांव मध्य प्रदेश येथे डिसेंबर 1843 येथे काम केले.
1844-45 मध्ये ग्वालीयर चे मुख्य इंजिनिअर म्हणून तर मोरार नदीवर आर्च ब्रिज निर्माण करणायची जबाबदारी सोपविली.1845 -46 मध्ये पंजाब येथे बियास नदीवर दोन ब्रिज निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली.1846 मध्ये ब्रिटिश सिव्हिल सर्वंट वान्स आग्नेव यांनी कमिशनर म्हणून नियुक्ती केली व लेह लडाख व तिबेत च्या सीमेचा सर्वे कारणे व सीमा निश्चित करण्याची जबाबदारी त्याचे वर सोपविण्यात आली, ते काम 1847 ला पूर्ण केले,याच कालावधी मध्ये खालसा सीख  व इस्ट इंडिया कंपनी मध्ये वॉर झाले त्याचें नेतृत्व यांनी केले व विजय मिळवून दिला.  त्याने 1848 ला ऑर्डर ऑफ आयर्न आर्किटेकचर हा प्रबंध लिहिला. (Alexander Cunningham Father of Archeology)
1856 मध्ये बर्मा चे चिफ इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली व इथे त्यांनी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ऑफ इंडिया ची स्थापना केली,1860 मध्ये त्यांची रॉयल इंजिनिअर चे कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आली, व 30 जून 1861 ला मेजर जनरल ( सर्वोच्च रँक )म्हणून रिटायर झाले आणि इथूनच त्यांची बुद्धीझम वर काम करण्याची सुरुवात झाली.
1834 मध्ये येसीयाटीक सोसायटी ऑफ बेंगाल च्या जर्नल मध्ये जेम्स प्रिन्सेप चे मंकीयाला बुद्ध स्तूप मधील रिलीक्स वर  आर्टिकलं वाचून सर अलेझानंडर फार प्रभावित झाला. ( सध्या हा स्तूप पंजाब प्रोविन्स पाकिस्तान मध्ये आहे ).
1837 मध्ये जेंव्हा तो सारनाथ येथे असताना एका संध्याकाळी सहज फिरायला गेला असता एक टोम्ब(थडगे )त्यांच्या नजरेत पडले, त्याला असे वाटले की हे कोणत्यातरी महाराजांचे थडगे असेल म्हणून त्याने ते थडगे  ऊतखनन करन्याची परवानगी मागितली व त्याच बरोबर निधी ची मागणी केली, त्याला उतखनन करण्याची परवानगी मिळाली परंतु निधी मात्र मिळाला नाही. निधी मिळाला नाही म्हणून तो स्तब्ध बसला नाही तर स्वतःच्या पगारातून त्याने त्या थडग्याचे उतखनन केले व (ब्रिटिश आर्मी ऑफिसर फ्रेडरिक चार्ल ला सोबत घेतले हा पैंटिंग, वाटर कलर करण्यात पटाईट होता )तिथे त्याला एक दगडावर काही तरी लिहिलेला एक शिलालेख सापडला तो त्याने जेम्स प्रिन्सेप कडे पाठवीला.जेम्स प्रिन्सेप ने वाचन करून सांगितले की याच ठिकाणी बुध्दानी आपल्या प्रथम पांच अनुयायाना धम्मोपदेश केला तो दिवस होता आषाढी पौर्णिमा त्याला गुरु पौर्णिमा असे म्हणतात ते पाच भिक्कू या प्रमाणे कौडीन्य, वप्प, भद्दीय, अस्सजीत आणि महानाम होते,यालाच बुद्धांचे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन असे संभोधल्या जाते. (Alexander Cunningham Father of Archeology)
1842 ला संकीसा स्तूपाचे उतखनन केले हा स्तूप श्रावस्ती मध्ये आहे, संकीसा एक प्राचीन बुद्धिस्ट सेंटर होते.
1850-51 मध्ये सांची स्तूपाचे उतखनन केले त्याकरिता निधी शाह बेगम ऑफ नवाब ऑफ भोपाळ यानी उपलब्ध करून दिला.येथे सारीपुत्त आणि महामोगलायन च्या अस्थी शोधून काढल्या, व त्याचा आजू बाजूचा परिसर यांचे उतखनन केले व 1854 ला भिलसा टोप्स म्हणून पुस्तक लिहिले,(या पुस्तकात एकूण चार धम्म संगितीचे वर्णन आहे तसेच पहिल्या धम्म संगीती मध्ये बुध्दा करिता उत्तर दिशेला एक आसन राखीव ठेवण्यात आले होते, कारण राजा अजात शत्रू ने बुध्दाला धर्मराजा म्हणून घोषित केले होते, तसेच पायथ्यागोरस यांचा सिद्धांत मांडला बुद्ध म्हणजे माईंड, धम्म म्हणजे मॅटर आणि संघ म्हणजे मार्केट प्लेस )याच ठिकाणी सोनारी स्तूप शोधून काढला की ज्या ठिकाणी सम्राट अशोक यांनी 84000 बुध्द अस्थी  कलश चे वितरण केले व संपूर्ण देशात 84000 स्तूप निर्माण करण्यात आले.
1861 मध्ये डिपार्टमेंट ऑफ ऑरकोलॉजि ची स्थापना केली व त्याची पहिले सर्वेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर महाराणी येलिझाबेद ने त्याची गवर्नल जनरल ऑफ इंडिया म्हणून नेमणूक केली. व या माध्यमातून त्यानी भारतात बुद्ध स्तूप, बुद्ध लेणी यांचे सर्वे करणे, संवर्धन करणे व रीस्टोर करने इत्यादी महत्वपूर्ण कार्य सुरु होते, परंतु 1866 मध्ये हा डिपार्टमेंट निधी च्या अभावी अचानक बंद करन्यात आला. म्हणून ते इंग्लंड ला गेले व महाराणी एलीझाबेद ची भेट घेतली व या डिपार्टमेंट ची भारतात किती गरज आहे, हे डिपार्टमेंट भारतात बुद्धीझम पुणरस्थापित करण्याकरिता किती महत्वाचा आहे हे पटवून दिले आणि जर का तुम्ही हे डिपार्टमेंट चालू करीत नसाल तर तुम्ही दिलेली सर्वोच्च पदवी “सर “मी परत करेन. यावर महाराणी ने हे डिपार्टमेंट पुन्हा चालू करण्यात येईल असे सांगितले. (Alexander Cunningham Father of Archeology)
परंतु तो स्वस्थ न बसता पाठपुरावा चालूच होता त्याच बरोबर लेणी वर, स्तूपा वर संशोधन ग्रंथ लिहिणे चालू होते व विविध ठिकाणी बुध्दाच्या संबंधित भेटी देने चालू होते. शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि 1870 मध्ये लॉर्ड मेयो यांनी हा डिपार्टमेंट पुन्हा चालू केला व त्याची आर्किओलॉजि सर्वेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती केली व त्या डिपार्टमेंट ला डायरेक्ट राजघराण्यातुन निधी उपलब्ध करून देण्यात आला .
कुशीनारा बुध्दा स्तुपाचे ऊतखनन केले आणि बुध्दाची महापरीनिर्वाण मूर्ती शोधून काढली, या करिता तो तीन दिवस संपूर्ण जंगल फिरत होता अन्न नाही किंवा पाणि नाही किंवा जंगलात कोणी नाही आणि जे असतील त्याला भाषा येत नाही. परंतु त्याला दृढ विस्वास होता की मी ज्या ठिकाणी बुध्दाचे महापरिनिर्वाण झाले ते मी शोधून काढणार.
1812 मध्ये फ्रांचीच बुचानन यांनी नालंदा चा शोध लावला परंतु हेच प्राचीन नालंदा बौद्ध विद्यापीठ आहे ते यांनी सिद्ध केले. त्याच प्रमाणे तक्षशिला बुद्ध विदयापीठा चा शोध लावला.
त्याने दोन वेळा अयोध्या ला भेट दिली परंतु उतखनन करू शकला नाही कारण त्या ठिकाणी मस्जिद आणि मंदिर होते.
1853-1856 आणि 1873-73 मध्ये हरप्पा आणि मोहोनजडो यांचे ऊतखनन केले व इंडस शील शोधून काढले व 1875 मध्ये जागतिक नकाशावर आणले.तसेच वैशाली चा स्तूप व केसरिया स्तूप 1875 ला शोधून काढला.
1880 ला महाबोधि विहार ला भेट दिली त्याची दुर्दैशा बघून त्याला फार वाईत वाटले, बुध्दाच्या मूर्ती, पिल्लर्स व अनेक शिल्प महंतानि आपल्या मठात अस्त व्यस्त ठेवले होते, त्याची मागणी केली असता त्याने नकार दिला. ज्या ठिकाणी बुद्ध पद्मासन  अवस्थेत बसले होते ते ठिकाण म्हणजे वज्रांसन व बुध्दाच्या अस्थी फेब्रुवारी 1881 ला शोधून काढले व 1885 मध्ये त्यावर पुस्तक लिहिले.
1877 मध्ये सम्राट अशोकाचे शिला लेख फोटोसहीत प्रसिद्ध केले.
1879 ला भहरूत स्तुपाचे उतखनन केले की जो स्तूप पुष्यमित्र शुन्ग ने जीर्णोद्धार केला होता.
मिगार माता विशाखा ने बुध्दाकडे पाच प्रॉमिस मागितले होते, परंतु आलेक्षान्डर कंनींघम आपल्या भिलसा टोप्स मध्ये नमूद करतात की मिगार माता विशाखा ने बुध्दाकडे एकूण सात प्रॉमिस मागितले,6 वे प्रॉमिस चैत्य स्तुपाची पूजा करणे व दिवा बत्ती करणे,7 वे प्रॉमिस चैत्य स्तूपाची देखभाल करणे व दुरुस्ती करणे. (भिलसा टोप्स पेज न.36 to 40 पायथ्यागोरस हा भूमितीय शाश्त्रज्ञ होता A चा वर्ग + B चा वर्ग =C चा वर्ग हा त्यांचा जगप्रसिद्ध सिद्धांत आहे, परंतु त्याने पायथ्यागोरियन नावाचा बुद्धिस्ट संघ स्थापन केला होता. त्यांचा प्राचीन सिद्धांत A= बुद्ध म्हणजे माईंड, B=धम्म म्हणजे मॅटर आणि C= संघ म्हणजे मार्केट प्लेस ).
जेम्स प्रिन्सेप, आलेक्षाडर कँनिंगहम, जेम्स फर्ग्युशन आणि चार्ल मेशन यांनी संपूर्ण भारतात फिरून फक्त बुद्धिझमचाच इतिहास शोधून काढला व जगासमोर आणला, सम्राट अशोक चा इतिहास जगासमोर आणला, त्याना भारत भ्रमन करीत असताना इतरही काही धार्मिक स्थळें दिसली असतील परंतु त्यांच्या संदर्भ ग्रंथामध्ये जरा पण उल्लेख नाही. कारण त्याचे व्हिजन होते, ध्येय होते फक्त बुद्ध आणि बुद्धच. जन्माने जरी ते स्कॉटीश असले परंतु मनाने, विचाराने आणि कृतीने श्रेष्ठ बुद्ध उपासक होते, चायनीस प्रवासी हुयानत्संग ने जसे भारताचा बुद्धिझम चा इतिहास लिहून ठेवला मात्र
जेम्स प्रिन्सेप आणि अलेक्षानंडर यांनी हजारो वर्षाचा बुद्धीझम चा इतिहास उतखनन करून एकूण 33 वोलूम्स लिहिले, परंतु जेम्स प्रिन्सेप चे अचानक निधन झाल्यामुळे यांनी हे सर्व वोलूम्स पब्लिश केले.
अश्या या महान व्यक्तीला  बुद्ध धम्माचे महान कार्य आर्चीऑलोजिकल दृष्टीकोनातुन पुनरस्थापीत केल्या बद्दल त्यांच्या 210  व्या जन्मदिनाच्या  निमित्ताने विनम्र अभिवादन.
-शामराव सोमकुवर, लेखक पुरातात्विक मामलों के जानकार हैं…. 

यह भी पढ़ें: हिंदू कोई धर्म नहीं है बल्कि धार्मिक संप्रदायों का एक समूह है : संतोष शाक्य

यह भी पढ़ें: ईश्वर, धर्म और अध्यात्म ब्राह्मण-पंडा-पुरोहितों के लिए सामाजिक व्यवस्था पर कब्ज़ा करने के औजार मात्र हैं…

यह भी पढ़ें: ब्राह्मणवाद में डूबी कृषक, पशुपालक जातियों ने सामाजिक न्याय की हत्या की : संतोष शाक्य

यह भी पढ़ें: बौद्ध भिक्षु अनागारिक धम्मपाल के कारण विश्व धर्म संसद में बोल पाए विवेकानंद


Related Articles

Recent